शिवसेनेची अयोध्येतील सभा रद्द; औरंगाबादेत होर्डिंग उतरवले

Foto

औरंगाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी अयोध्येत होणाऱ्या जाहिर सभेला उत्तर प्रदेश सरकारने ऐनवेळी परवानगी नाकारली. यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. उद्धव ठाकरेंना उत्तर भारतात प्रथमच जाहिर सभेत बोलताना पाहाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. अयोध्येतील सभा रद्द झाल्याचे कळताच औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले चलो अयोध्या, जाहीर सभा हे होर्डिंग उतरवण्याची वेळ शिवसैनिकांवर आली. ऐनवेळी होर्डिंग उतरवण्याचे आदेश आल्यानंतर शिवसैनिकांनी घाईघाईत काही ठिकाणे होर्डिंग उतरवले तर काही होर्डिंग तसेच झळकत राहिले.

शिवसेना अयोध्येत शक्ती प्रदर्शन करणार होती. यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांचे थ्ते अयोध्येकडे रवाना झाले. जय श्रीराम आणि मंदिर वही बनाएंगेहर हिंदू कि यही पुकारपहले मंदिर फिर सरकार  शा घोषणा देत शिवसैनिकांनी अयोध्येकडे कूच केले. मात्र उत्तरप्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने शिवसेनेला सभेची परवानगी नाकारली असल्याची माहिती आहे.

अयोध्येत राम मंदिर बनवणारच अशी भूमिका घेत शिवसेनेने राज्यभरात शिवसैनिकांना चलो अयोध्या असा नारा दिला होता. याची जय्यत तयारीही शिवसैनिकांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती. २४ व २५ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत दाखल होत सभेद्वारे शिवसैनिकांना संबोधीत करणार होते. मात्र आता सभेला परवानगी नाकारल्याने काही प्रमाणात शिवसैनिकांचा हिरमोड झाला असला तरी अयोध्येत दाखल होण्यासाठी शिवसैनिक आपल्या निर्णयावर ठाम आहे. 

रात्रीतून काढले होर्डिंग 

औरंगाबादेत शिवसैनिकांनी शहरभरात मोठ्या प्रमाणात श्रीरामाची प्रतिमा असलेले होर्डिंग लावले होते. चौका-चौकात हे होर्डिंग पाहणाऱ्यांचे लक्ष वेधत होते. सभा रद्द झाल्याचे कळताच शिवसैनिकांनी हे होर्डिंग काढून घेतले. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरानिराला बाजारक्रांती चौकटीव्ही सेंटरशिवाजी नगरपुंडलिकनगरसिडको चौक या ठिकाणची सर्व होर्डिंग रात्रीतून काढण्यात आले असले तरी काही ठिकाणचे होर्डिंग तसेच झळक असल्याचे शुक्रवारी दिसले.

 

"आम्ही अयोध्येकडे निघालो आहोत" मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा. सामनातील अग्रलेख लक्षवेधी 

आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर २०१९ च्या रोजीरोटीचे कायया पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्या. तेव्हा काहीही करून शिवसेनेस रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे कीहे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाहीआमच्या अयोध्या यात्रेमुळे अनेकांच्या नाडीचे ठोके चुकले आहेत व अनेकांच्या नाड्या सुटल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगतोय, ‘ठाकरे’ अयोध्येत निघाले आहेतपण मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा.